ह्या ८२वर्षाच्या तरुण लढवय्या व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा .
विद्यापीठ निर्मिती आणि विकासासाठी आग्रही असणारे मला भावलेले मा. शरद पवार साहेब. महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात नेहमीच आपली घट्ट पकड ठेऊन देशातील शेती ,शिक्षण ,कला , साहित्य ,क्रीडा ई.क्षेत्रात अत्यन्त सुष्म बारकावे लक्षात घेऊन सर्वांच्या हिताचा निर्णय घेणारे पदमविभूषण मा.शरदचंद्र पवार साहेब ह्यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमीत्य त्यांना हार्दिक शुभेच्छा. मा. साहेबांना २०१७ रोजी मराठवाडयातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मानद डी.लिट .पदवी प्रदान करून त्यांचा सन्मान केला. ह्या पदवी प्रदान समारंभ प्रसंगीच्या काही गोष्टी मला खूप भारावून गेल्या. मी राष्ट्रीय सेवा योजना मध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करत असताना मी व माझे सर्व स्वयं सेवक आम्ही तिथे उपस्थित होतो.साहेब वेळेला खूप महत्व देतात हे मला आधीच माहित होते पण ते प्रत्क्षात देखील पहिले . समारंभाच्या खूप वेळोअगोदर ते विद्यापीठात पोहचले .मा.कुलपती तथा महामहिम राज्यपाल चे. विद्यासागर राव ह्यांचे आगमन झाल्याबरोबर समारंभास सुरवात झाली. ऐरवी विध्यार्थी आणि त्यांच्या पालकां...