पोस्ट्स

उमरी नगरपरिषद तर्फे 33 लाख रुपये उपदान कर्मचाऱ्यांना वाटप

इमेज
उमरी ता.प्रतिनिधी: दिनांक 14 /7/ 2022 रोजी उमरी नगरपरिषद तर्फे नगर परिषद उमरी कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी व वारसा यांना शिल्लक रजाचा पगार तसेच उपदान असे एकूण कर्मचारी 15 यांचे रक्कम 33,67,000/- लाख रुपये यांच्या खात्यात आज रोजी मुख्यधिकारी श्री गणेश चाटे लेखापाल ज्योतीराम जाधव, सहाय्यक लेखापाल सत्यनारायण पिंडकूरवार यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचा लाभ देण्यात आला आहे त्यावेळी माजी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास अनंतवार, नगरपरिषद कर्मचारी संघटना अध्यक्ष गणेश शंकरराव मदने, उपाध्यक्ष सचिन संभाजी गंगासागरे, सचिव चंद्रकांत प्रल्हाद श्री कांबळे नगर अभियंता संतोष मुंडे, रघुनाथ जोंधळे गौतम सोनपळे माणिक पेंडकर  सेवानिवृत्त कर्मचारी देविदास सवई, दिलीप पोलशेतवार, महाराज गायकवाड, रमेश पोलशेतवार, धुरपतबाई शेळके, यसुफ बेग, शमीम बेग ,अंकुश सवई, माधव जाधव ,शंकर माने रमाबाई करपे, सुमनबाई पोलशेतवार पत्रकार ,कैलास सोनकांबळे पत्रकार, गंगाधर पवार, आकाश खंदारे संगीता हेमके, इत्यादी कर्मचारी हजर होते. त्यावेळी उमरी नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी गणेश चाटे साहेब ...

उमरी तालुक्यातील ३८ गावांचे ड्रोनद्वारे सर्वे करून पी.आर कार्ड तयार होणार

इमेज
    भूमि अभिलेख नांदेड च्या वतीने उमरी तालुक्यातील ३८ गावांचे ड्रोनद्वारे सिटी सर्वेक्षण जी.आय.एस प्रणाली द्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे आज उमरी तालुक्यातील ३८ गावातील घरांचे कुठलेच अभिलेख उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे पी.आर कार्ड मिळकत पत्रिका तयार करण्याचे  भुमी अभिलेख विभागाने काम हाती घेतले आहे.आज मौजे बोळसा बु येथील गावठाण क्षेत्राचे चुना व पेंट द्वारे खुणा कायम करुन ड्रोन द्वारे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.असून त्यांना पुढील टप्प्यात प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. भूमि अभिलेख विभागाच्या वतीने आज मौजे बोळसा बु येथे गावठाण ड्रोन सर्वे या कामाचे उद्घाटन करुन कामास सुरुवात करण्यात आली यावेळी उमरी तालुका भुमी अभिलेख कार्यालयाकडून उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती भुमी अभिलेख नांदेड जिल्हा अधीक्षक सौ. एस.पी.शेट्टीया मॅडम, उमरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार मा. माधवराव बोथीकर साहेब, भुमी अभिलेख उमरीचे उपाधिक्षक मा.निलेश उंडे साहेब, मा.पिंपळगावकर, मा.डाके साहेब,मा.मुनलोड साहेब, मा. अनिल दासरे,मा.सरपंच माधवराव निरदोडे, मा.उपसरपंच गणपतराव पाट...

माझी शाळा एक आठवण

🟣*माझी शाळा*🟣 आयते शर्ट  ते बी ढगळ, चड्डीला आमच्या मागून ठिगळ!!                      त्यावर करतो                      तांब्यानी प्रेस,                      तयार आमचा                      शाळेचा ड्रेस!!                                   खताची पिशवी स्कूल बॅग, ओढ्याचं पाणी वाॅटर बॅग!!                           धोतराचं फडकं                   आमचं टिफीन,                   खिशात ठेवुन                   करतो इन!! करदोडा आमचा असे बेल्ट, लाकडाची चावी होईल का फेल ?         ...

वंचित बहुजन आघाडी नगर परिषद निवडणूक पुर्ण ताकदीने लढवणार*"""फारुख अहेमद"""

इमेज
मुदखेड ता.प्र. आगामी काळात नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती होणाऱ्या निवडणूका वंचित बहुजन आघाडी संपूर्ण आठरा पकड समाजाला जागृत करून त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करून निवडणुका पुर्ण ताकदीने लढवणार असल्याचे मुदखेड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी आयोजन केलेल्या जाहीर सभेत राज्य प्रवक्ता वं.ब.आघाडी मा.फरुख अहेमद यांनी बोलताना सांगितले आहे. या जाहीर सभेला राज्य प्रवक्ते वं.ब.आ. फारुख अहेमद, राज्य उपाध्यक्ष वं.ब.आघाडी गोविंद दळवी,जिल्हानेते सुनील सोनसळे,यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी सभापती बालाजी सुर्यतळे, तालुका अध्यक्ष गंगाधर पाटिल पवार, का.क तालुका अध्यक्ष मोहणराव कांबळे,माजी नगरसेवक अँड.कमलेश चौदंते, तालुका संपर्क प्रमुख राहुल आप्पा चौदंते,फुलसिंग चव्हाण,सूत्रसंचालन डि. जी.चौदंते सर यांनी केले तर आभार व्यक्त जनार्दन कोलते यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निखिल चौदंते, शंकर चौदंते, बाबुराव कोलते, सचिन हौसरे,स्वप्नील वाघमारे, रामजी भंडारे,रोशन कोलते,प्रभाकर पाटिल पवार,सुनिल गायकवाड,यांनी परिश्रम घेतला होता.

निकृष्ठ दर्जाचे व लायसन्स नसताना ISI क्रमांक टाकून पी व्ही सी पाईप विक्री केल्या बद्दल " सुप्रीम गोल्ड"कंपनीवर गुन्हा नोंदवावा मागणी...(आप नांदेड)

इमेज
किवळा येथील शेतकरी अवधूत संभाजीराव पवार यांनी सुप्रीम गोल्ड गुंडेगाव येथील कंपनी कडून 2 इंची 30  नग पी व्ही सि पाईप खरेदी केले होते सदर पाईप एका महिन्यात दोन वेळा तडकून फुटले व शेतकऱ्याचे हळद, अद्रक,चिकू, लिंबोनी फलबागेचे जवळपास 2 ते 3 लाख रुपयांचे नुकसान झाले .सदर शेतकऱ्याने ISI कंपनीला पाईपचा दर्जा तपासावा व निकृष्ट दर्जा असेल तर कळवावे असा अर्ज केला. परंतु ISI कंपनीने सुप्रीम च्या प्रतिनिधी ने शेतावर भेट दिली परंतु पाईप सॅम्पल नेऊन सुद्धा पाईपचा दर्जा तपासला नाही व फुटलेल्या चार पाईपचा किंमत 5000रु शेतकऱ्यांना दयावे असे आदेशीत केले. म्हणून शेतकऱ्यांने सुप्रीम गोल्ड कंपनी वर फसवणुकीचा गुन्हा नोंद करावा असा रीतसर अर्ज पोलीस स्टेशन सोनखेड येथे दिला .परंतु सोनखेड पोलासानी सुद्धा गेल्या 3/ 4 महिन्यात समाधानकारक तपास केला नसल्याने आज आम आदमी पार्टी नांदेड समिती ने सोनखेड API विशाल भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले . जर सात दिवसात सुप्रीम गोल्ड कंपनी वर गुन्हा नाही केला तर आम आदमी पार्टी आंदोलन करील असा इशारा देण्यात आला..     सदर निवेदनावर फाऊंडर मेंबर नरेंद्रसिंघ...

ह्या ८२वर्षाच्या तरुण लढवय्या व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा .

इमेज
विद्यापीठ निर्मिती आणि विकासासाठी आग्रही असणारे मला भावलेले  मा. शरद पवार साहेब. महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात नेहमीच आपली घट्ट पकड ठेऊन देशातील शेती ,शिक्षण ,कला , साहित्य ,क्रीडा ई.क्षेत्रात अत्यन्त सुष्म बारकावे लक्षात घेऊन सर्वांच्या हिताचा निर्णय घेणारे पदमविभूषण मा.शरदचंद्र   पवार  साहेब ह्यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमीत्य त्यांना हार्दिक शुभेच्छा. मा. साहेबांना २०१७ रोजी मराठवाडयातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मानद डी.लिट .पदवी प्रदान करून त्यांचा सन्मान केला. ह्या पदवी प्रदान समारंभ प्रसंगीच्या काही गोष्टी मला खूप भारावून गेल्या. मी राष्ट्रीय सेवा योजना मध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करत असताना मी व माझे सर्व स्वयं सेवक आम्ही तिथे उपस्थित होतो.साहेब वेळेला खूप महत्व देतात हे मला आधीच माहित होते पण ते प्रत्क्षात देखील  पहिले . समारंभाच्या खूप वेळोअगोदर ते विद्यापीठात पोहचले .मा.कुलपती तथा महामहिम  राज्यपाल चे. विद्यासागर राव ह्यांचे आगमन झाल्याबरोबर समारंभास सुरवात झाली. ऐरवी विध्यार्थी आणि त्यांच्या पालकां...

टेम्भूर्णी नगरी मध्ये हजरतं मदारशाह वली जंगी कुस्त्या व यात्रा भरण्यात आली.

इमेज
नायगाव (प्रतिनिधनी) नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात टेंभुर्णी नगरीमध्ये हजरत मदार सावली जंगी कुस्त्यांचे यात्रा भरविण्यात आली होती  या यात्रेमध्ये अनेक कुस्तीपटूंनी सहभाग नोंदविला दिनांक 23 मार्च रोजी या जंगी कुस्त्यांचे सामने पार पडले. या यात्रेचा मान पहिलवान राजु निळा व पहलवान दीपक राहणार लातूर यांना होता. सदर यात्रेदरम्यान कुस्तीपटूंनी व मोठ्या संख्येत नायगाव तालुक्यातील नागरिकांनी सहभाग नोंदविला, यावेळी श्री. बालाजी दत्ता वडजे. माझी पंचायत समिती सदस्य...... माझी सरपंच बालाजी भास्करे.जालणेकर. व मदरसाब शेख.. भगवानराव वडजे माली पाटील.... मुखीम  सय्यद. राजेश्वर मंगनाळे. व्यंकटी भास्करे माझी पहेलवान. टेम्भूर्णी. नबीसाब सय्यद. अशोकराव माली पाटील. काशिमसाब पठाण. गणपतराव कांबळे. ग्रामपंचायत सेवक. आनंदा गजभारे. रोजगार सेवक. संभाजी वडजे..   सरपंच  सुगंधराव वडजे. उपसरपंच. अहेमदसाब नबीसाब सय्यद.. आनंद वडजे... राजेश भास्करे. शादुल शेख.. रियाज शेख. रमेश शेळके जिलानी सय्यद. दिगंबर वडजे सेवानिवृत सहशिक्षक ज़िल्हा परिषद शाळा.. अजुरोदिन सय्यद. महेबूब मुजावर अहे...